Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभेसाठी दाखल केला उमेदवारी अर्ज

Sunetra Pawar :- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल हे लोकसभेवर खासदार म्हणून गेल्याने त्यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar) यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदींसह मंत्री, आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

बुधवारी 12 जून रोजी अजित पवारांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्बत करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली होती. यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता. तर सुनेत्रा पवार पराभूत झाल्या होत्या.