आई-बाप काढायचे नाहीत… लोकसभेत सुप्रिया सुळेंनी भाजप मंत्र्याला झापलं !

नवी दिल्ली : केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. सोमवारी या अर्थसंकल्पावरील चर्चेत खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य केलं. सुळे यांनी धर कुटुंबियांकडून चालवण्यात येणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कूलचं उदाहरण देत त्या इतिहासात अडकण्यापेक्षा आपण नव्या उपाययोजना कराव्या असा सल्ला केंद्र सरकारला दिला.

यावेळी केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंग आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाले. जितेंद्र सिंह यांनी आपल्या भाषणात काश्मिरी पंडितांचा मुद्दा उपस्थित केला होता. तेव्हा जितेंद्र सिंह यांनी किती हॉटेल्स तिथे बांधले? काय सुविधा दिल्या? अशी विचारला केली. दरम्यान, आपल्या भाषणाचा उल्लेख आल्यानंतर जितेंद्र सिंह यांनी सुळे यांना रोखत ‘आई-वडिलांनी आमच्यासाठी काय केलं हे आम्ही सांगणार नाही, असं त्यांना बोलताना मी ऐकलं होतं. सांगायचं नसेल तर नका सांगू पण तुमच्या आई-वडिलांमुळेच तुम्ही इतक्या सक्षम झालात आणि आज संसदेत उभ्या आहात. इतरांकडून आपल्याला काय मिळालं ते आपण विसरु शकत नाहीत. तुम्हीही तुमच्या आई-वडिलांमुळेच इथे आहात’, असं उत्तर दिलं.

त्यावर सुप्रिया सुळे यांनी तिथंच जितेंद्र सिंग यांना झापलं. ‘मी घराणेशाहीवर काही बोलले नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, मग आमची काय अडचण आहे? असा सवाल त्यांनी केला. तसंच आई-वडिल सोडून काहीही बोलावं. आई-बाप काढायचे नाहीत’, अशा शब्दात सुळे यांनी सिंह यांना उत्तर दिलं. माझ्या पालकांचा मला अभिमान आहे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.