Supriya Sule | निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं (Central Election Commission) घेतला आहे. विधिमंडळातील बहुमत चाचणीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याचिकाकर्ते अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष असून त्यांना पक्षाचे हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार आहे, असं आयोगानं आपल्या निर्णयात स्पष्टपणे नमूद केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केलं आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय आपण विनम्रपणे स्वीकारत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले. दरम्यान, शरद पवार गटांनं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचं ठरवलं असल्याचं शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या आणि राज्यसभेच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?