सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा, थेट दिल्लीतून आदेश

Mumbai – कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीतील युवा नेता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी नाशिकच्या पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावरून राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या राजकीय खेळीची चर्चा होऊ लागली आहे.

सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरणे, वडील सुधीर तांबे यांना एबी फॉर्म आलेला असतांना निवडणुकीतून माघार घेणे, आणि भाजपनेही उमेदवार न देणे ही फडणवीस यांची राजकीय खेळी असल्याचे बोललं जात आहे.याच दरम्यान, काल आमदार सुधीर तांबे (satyajeet tambe father) याचं पक्षाने निलंबन केल्यानंतर आता सत्यजित तांबे यांनाही पक्षातून निलंबित करा, अशा सूचनाच काँग्रेस हायकमांडने दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.त्यामुळे सत्यजित तांबे यांना कोणत्याही क्षणी निलंबित करण्यात येणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तांबे पितापुत्रांना मोठा झटका बसला आहे.(Suspend Satyajit Tambe from the party, direct orders from Delhi) .

सत्यजित तांबे हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र त्यांनी नाशिक पदवीधर मतदार निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून केंद्रीय नेतृत्वाकडे अहवाल पाठवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सत्यजित तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी सूचना केली आहे.