‘विमा’ म्हणजे काय ? ‘ हि ‘ प्राथमिक माहिती तुम्हाला असणे आहे आवश्यक

विमा उतरवताना आपल्याला विम्याची प्राथमिक माहिती असणे आवश्यक आहे, जेणेकरून विमा उतरवताना कोणताही संभ्रम राहत नाही. आणि शाब्दिक गोंधळ देखील उडत नाही . तर मग जाणून घेऊयात विमा म्हणजे नक्की काय आणि त्याचे निकष काय आहेत .

विमा म्हणजे काय :
विमा म्हणजे एकप्रकारचे सुरक्षा कवच आहे. कमी किंवा मर्यादित रकमेत मोठी सुरक्षा प्रदान करणारी विमा आपण नसताना आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार ठरण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.

खात्रीशीर रक्कम
ही विम्याची रक्कम असून जेवढ्या रकमेचा विमा घेतला आहे, त्या रकमेला खात्रीशीर रक्कम म्हणतो. ही मिळणारी रक्कम विमाधारक किंवा त्यांच्या वारसाला मिळते.

विमाधारक कशाला म्हणतात:
ज्या व्यक्तीचा विमा काढला/ उतरविला जातो त्याला विमाधारक किंवा इन्शोअर्ड म्हणतात. एखाद्या विशिष्ट वयापर्यंतच विमा काढता येतो. त्यासाठी आरोग्य चांगले असणे गरजेचे आहे.

विम्याचे निकष :
प्रत्येक पॉलिसीचे निकष आणि वैशिष्ट्ये वेगळे असतात. एखाद्या ठराविक रकमेपर्यंत चाचणीची गरज लागत नाही. परंतु विम्याची रक्कम अधिक असेल तर विमा कंपन्यांनी नेमलेल्या डॉक्टरकडून चाचणी करावी लागते. तसेच पाल्याच्या नावावर पॉलिसी काढायची असेल तर त्याचा जन्मतारखेचा दाखला आदी गोष्टींची गरज लागते.

हप्ता :
पॉलिसी घेतल्यानंतर आपण जी ठराविक काळानंतर रक्कम जमा करतो त्याला विमा हप्ता म्हणतो. त्यात मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक, वार्षिक किंवा एकल हप्ता. आपल्या घरखर्चाचा ताळमेळ बसवून विमा हप्त्याची तारीख निश्चित करू शकतो.