खाण्याच्या वाईट सवयींमुळे वाढतोय मुलांचा लठ्ठपणा, डाएटमध्ये ‘हे’ बदल करुन वजन ठेवा नियंत्रित

Obesity In Kids: आजकाल आपल्या जीवनशैलीचा (Lifestyle)आपल्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहे. चुकीच्या आहारामुळे लोक सतत अनेक समस्यांना बळी पडत आहेत. लठ्ठपणा (Obesity) ही आजकाल एक अशी समस्या बनली आहे, ज्यामध्ये केवळ प्रौढच नाही तर लहान मुले देखील याच्या विळख्यात येत आहेत. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढणे ही आजकाल एक सामान्य समस्या बनली आहे. आजकाल मुलांचा बहुतेक वेळ स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टीव्हीवर जातो. अशा परिस्थितीत अनेक तास एकाच जागी बसणे आणि फास्ट फूडचे अतिसेवन यामुळे मुलांचे वजन झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या आहारात योग्य ते बदल करून तुम्ही तुमच्या मुलाचे वाढते वजन नियंत्रित करू शकता.

डाळ
आजकाल बहुतेक मुले बाहेरचे फास्ट फूड (Fast Food) खाणे पसंत करतात. पण सतत फास्ट फूड खाणे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या मुलाचे वजन नियंत्रित करायचे असेल तर त्यांच्या आहारात डाळींचा अवश्य समावेश करा. यामध्ये असलेले प्रोटीन शरीराच्या विकासासाठी खूप महत्वाचे आहे. यासोबतच यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि गॅसच्या समस्यांपासून आराम मिळतो.

हिरव्या पालेभाज्या
हिवाळ्यात अनेक हिरव्या पालेभाज्या (Leafy Vegetables) बाजारात उपलब्ध असतात. याचे सेवन केल्याने मुलांना अनेक फायदे होतात. पालेभाज्या खाल्ल्याने त्यांचा सर्वांगीण विकास तर होतोच, पण वजन कमी करण्यातही खूप मदत होते. यामध्ये असलेले लोह, पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए, सी, बी आणि कॅल्शियमसारखे पोषक घटक मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.

धान्य
संपूर्ण धान्य आपल्या आरोग्यासाठी आश्चर्यकारकपणे फायदेशीर आहे. यामध्ये फायटिक अॅसिड, फायबर, झिंक, लोह, मॅंगनीज, प्रथिने असे अनेक पोषक घटक आढळतात. हे खाल्ल्याने मुलांचे पोट हलके राहते आणि त्यांना दिवसभर ऊर्जा मिळते. ओट्स, दलिया, काळा हरभरा, बाजरी आणि नाचणी तुमच्या मुलांना संपूर्ण धान्य म्हणून देऊ शकता.

दूध
शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी दूध (Milk) अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यांच्या आहारात दुधाचा अवश्य समावेश करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमच्या मुलांना कमी फॅटचे दूध देऊ शकता. हे प्यायल्याने त्यांच्या शरीरातील चरबीऐवजी कॅल्शियमचा पुरवठा होतो. दुधाव्यतिरिक्त तुम्ही त्यांना दहीही देऊ शकता.

पनीर
तुमच्या मुलाच्या वाढत्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही त्यांना पनीरही (Paneer) खाऊ घालू शकता. यामध्ये मुबलक प्रमाणात असलेले प्रथिने मुलांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात. याशिवाय तुम्ही त्यांना अंड्याचे ऑम्लेट किंवा चिकन सूप देऊ शकता.

(टीप: लेखात नमूद केलेला सल्ला आणि सूचना केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून घेऊ नयेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)