तब्बूने वयाच्या ५२व्या वर्षीही अविवाहित असण्यामागचे सांगितले कारण; म्हणाली, ‘अजय देवगणला आजही…’

नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू (Tabu) अजूनही कुवारी आहे. तब्बूचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे, परंतु एकही नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. तब्बूच्या दमदार अभिनयाचे लोक वेडे आहेत. वयाच्या ५२ व्या वर्षीही तब्बू चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत आहे. तब्बूला तिच्या लग्नाबद्दल (Tabu On Her Marriage) अनेकदा प्रश्न विचारले जातात. आता एका मुलाखतीत तब्बूने लग्न न करण्याचे कारण सांगितले आहे. तब्बूने खुलासा केला आहे की तिचे लग्न न करण्याचे कारण अजय देवगण (Ajay Devgan) आहे.

तब्बू आणि अजय देवगणची खास बॉन्डिंग आहे. तब्बू आणि अजय देवगण यांनी कधीकाळी एकमेकांना डेट केले होते. जरी नंतर अजयने काजोलशी लग्न केले आणि तब्बू अजूनही अविवाहीत आहे, तरी अजय देवगण आणि तब्बूमध्ये अजूनही चांगली मैत्री (Tabu Ajay Devgan Relation) आहे. दोघेही नुकतेच ‘दृश्यम 2’ चित्रपटात दिसले होते.

तब्बूने लग्नाबाबत खुलासा केला
काही काळापूर्वी तब्बूने एका मुलाखतीत अजय देवगणमुळे आपण अविवाहित असल्याचा आरोप केला होता. तब्बूने अजय देवगणसोबतच्या तिच्या नात्याबद्दल मोकळेपणाने सांगितले. तब्बूने मुलाखतीत सांगितले की, अजय देवगण लहान असताना तिचा शेजारी असायचा. तब्बूचे भाऊ समीर आणि अजय देवगण यांनी मिळून तिच्यावर विशेष नजर ठेवली होती. एखादा मुलगा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी ते त्याला धमकावून हाकलून द्यायचे. त्यामुळे तब्बूने अजय देवगणला सिंगल असल्याचा दोष दिला.

तब्बूने या गोष्टी मस्करीमध्ये सांगितल्या असल्या तरी चाहत्यांचा अंदाज वेगळाच आहे. तब्बूने असेही म्हटले की, ‘मला आशा आहे की अजय देवगणला आज या गोष्टीचा खूप पश्चाताप होत असेल.’

अजय देवगणसोबत तब्बूचे नाते खास आहे
अजय देवगणसोबत तब्बूचे नाते खास असल्याचे तब्बूने अनेकदा सांगितले आहे. तब्बूने मुलाखतीत सांगितले होते की, अजय देवगण हा एकमेव व्यक्ती आहे ज्यावर ती विश्वास ठेवू शकते. दोघांची ऑन स्क्रिन केमिस्ट्रीही लाजवाब दिसते. तब्बू आणि अजयने विजयपथ, दृश्यम, गोलमाल अगेन, दे दे प्यार दे आणि दृश्यम 2 सारख्या ब्लॉकबस्टरसह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.