स्वरा भास्कर दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात, हिंदू रितीरिवाजांनुसार करणार विवाह

Mumbai: राजकीय विचारांमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) सध्या तिच्या लग्नामुळे प्रकाशझोतात आली आहे. स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचे नेते फहाद अहमद (Fahad Ahmad) यांच्यासोबत कोर्ट मॅरेज केले आहे. लग्नाच्या ४० दिवसांनंतर तिने सर्वांना याबद्दल माहिती दिली आहे. स्वरा आणि फहाद यांच्या लग्नावरुन विविध प्रतिक्रिया पुढे येत आहेत. अनेकांनी भविष्यात तिची श्रद्धा वालकर किंवा तुनिशा शर्मासारखी स्थिती होईल, असेही म्हटले आहे.

यादरम्यान आता स्वराच्या लग्नाबद्दल मोठी अपडेट पुढे (Swara Bhasker Wedding) येत आहे. स्वरा दुसऱ्यांदा लग्न करणार असल्याचे समजत आहे. फहाद अहमदसोबत स्वरा हिचे आता हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न होणार आहे. विशेष म्हणजे या लग्नाची तयारी देखील सुरू करण्यात आलीये.

हळद, मेहंदी, संगीत आणि त्यानंतर रिसेप्शन हे सर्व फंक्शन देखील होणार आहेत. ११ ते १६ मार्च दरम्यान हे फंक्शन पार पडणार आहेत. विशेष म्हणजे आता लग्नाची पूर्ण तयारीही सुरू करण्यात आलीये.