Chandrashekhar Bawankule | सत्तेत असताना ठाकरेंनी शेतकऱ्यांना कविडीही दिली नाही, उबाठा गटाच्या जाहीरनाम्यावर बावनकुळेंची टीका

Chandrashekhar Bawankule | शिवसेना ठाकरे गटाचा जाहीरनामा गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाराष्ट्रावर केंद्रकडून होणाऱ्या अन्यायापासून मुक्ती देण्याचं आश्वासन दिलं. महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असून महाराष्ट्राचं वैभव पुन्हा प्राप्त करुन देण्यासाठी प्रय़त्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसेच शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठीही घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उबाठा गटाचा वचननामा नसून यूटर्ननामा आहे, अशी टीका केली आहे.

बावनकुळे म्हणाले, नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी आहे.

ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे ते म्हणतात आम्ही लूट थांबवू. अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांना कविडीही दिली नाही, फक्त घरात बसून राहिले ते म्हणतायत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ. उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीच्या ‘यूर्टननाम्या‘ला भुलणार नाही, असेही त्यांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच