महायुती सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्या – हसन मुश्रीफ

Hasan Mushrif: या तपोवन मैदानावर अनेक विराट सभा झाल्या त्या – त्या वेळी त्या मोठ्या होत्या मात्र आजची ही रेकॉर्ड ब्रेक सभा झाली त्याबद्दल हसन मुश्रीफ यांनी जनतेचे आभार मानले.

कुणाची तरी सभा झाली म्हणून ईर्षेने ही सभा आम्ही घेतली नाही. तर आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीत सहभागी झालो. आम्ही कशासाठी निर्णय घेतला आणि काय काय घटना घडल्या याची माहिती दादांनी आम्हाला दिली होती. प्रत्येक जिल्हयाच्या विकासासाठी व प्रलंबित प्रश्नासाठी सभा घ्यायचे ठरल्यावर ही उत्तरदायित्व सभा घेण्यात आली असेही हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

एखादे काम हातात घेतले की, दादा ते चिकाटीने पूर्ण करतात. कोल्हापूर शहरावर दादांचे विशेष प्रेम आहे. ही शाहूनगरी आहे. शाहू महाराजांनी अनेक समतेचे निर्णय इथे घेतले. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम केले. सर्व समाजाच्या मुलांसाठी वसतीगृह काढले होते हेही आवर्जून हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

५०० कोटीचा निधी पंचगंगा प्रदूषित झाली असून तिच्या शुध्दीकरणासाठी दिला. यावेळी दादांनी कोल्हापूरकरांसाठी दिलेल्या निधीचा पाढाच हसन मुश्रीफ यांनी वाचला.

आमच्या कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत असा आग्रहही हसन मुश्रीफ यांनी यावेळी धरला. महायुती सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्या असे आवाहनही हसन मुश्रीफ यांनी जनतेला केले. अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल आणि इतर सुविधा कोल्हापूरात करणार असल्याचा संकल्प हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, युवा नेते पार्थ पवार, युवा नेते नावेद मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार मकरंद पाटील, आमदार मानसिंग गायकवाड, माजी आमदार के. पी. पाटील, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिलाध्यक्षा शितलताई फरादपे, युवक शहराध्यक्ष आदील फरास आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

महत्वाच्या बातम्या-

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित