Virat Kohli ला आलीय इतिहास घडवण्याची संधी; ‘या’ विश्वविक्रमाच्या तो आहे अगदी जवळ

Virat Kohli’s Record: रविवारी (10 सप्टेंबर) आशिया चषकाच्या सुपर-4 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता आणि आता सामना आज म्हणजेच रिझर्व्ह डेला त्याच ठिकाणाहून सुरू होईल.

पाऊस सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाने 24.1 षटके खेळली होती. भारताकडून विराट कोहली ८आणि केएल राहुल १७ धावा करून नाबाद परतला. आता आज किंग कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर करायला नक्कीच आवडेल.

आज, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याद्वारे, विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद 13,000 धावा करणारा खेळाडू बनू शकतो. सध्या वनडेमध्ये सर्वात जलद 13 हजार धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 321 एकदिवसीय डावात हा आकडा गाठला. तर कोहली हा विशेष आकडा केवळ त्याच्या २६७व्या एकदिवसीय डावातच स्पर्श करू शकतो.

पाकिस्तानविरुद्धच्या थांबलेल्या सामन्यात कोहली 8 धावांवर नाबाद आहे. या 8 धावांसह कोहलीने वनडेत 12910 धावा पूर्ण केल्या आहेत. आता 13 हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी त्याला फक्त 90 धावांची गरज आहे. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहली इतिहास रचतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सुपर-4 च्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाकडून चांगली सुरुवात पाहायला मिळाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 100 चेंडूत 121 धावांची भागीदारी केली. यादरम्यान दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. मात्र, त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी आपापल्या विकेट्स गमावल्या. पावसापूर्वी टीम इंडियाने 24.1 षटकात 2 बाद 147 धावा केल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या-

महायुती सरकारने ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ घ्या – हसन मुश्रीफ

SBI Recruitment 2023: स्टेट बँकेत नोकरी करण्याची संधी, पगार 47,900 रुपयांपर्यंत असणार

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख; अवघ्या १४ महिन्यात १३,००० हुन अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाखांची मदत वितरित