“जेनिफरने असित मोदींना मैसेज केला की, मी सुधारलेय…”, तारक मेहताच्या मेकर्सचा मोठा गौप्यस्फोट

तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) या टिव्ही सिरियलचे निर्माता असिद मोदी (Asit Modi) यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील कलाकारांकडून आरोप होत आहेत. मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री (Jenniefer Mistry) यांनी असित मोदींवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर जेनिफर यांनी असित मोदींना आपली माफी मागण्यास सांगितले असल्याने दोघांमधील वाद चिघळला आहे. अशातच आता होत असलेल्या आरोपांवर तारक मेहता शो चे ऑपरेशन हेड सोहेल रेहमानी यांनी मौन सोडले आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, सोहेल रहमानीने (Sohail Rehmani) जेनिफरच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि सांगितले, ‘जेनिफरला शो आणि शोच्या निर्मात्यांसोबत खूप समस्या होत्या. तसे असेल तर 2016 मध्ये ती पुन्हा शो मध्ये का सहभागी झाली? यासाठी तिला कोणीही जबरदस्ती केली नव्हती. तिने असित भाईला मेसेज केला की, ‘मी सुधारले आहे. सर मला एक संधी द्या.’

जेनिफरवर कायदेशीर कारवाई

यादरम्यान रहमानी यांनी असित मोदींच्या विधानाचे समर्थन केले ज्यात त्यांनी अभिनेत्रीवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले होते. जेनिफरविरोधात माझ्याकडे भरपूर पुरावे आहेत, मी पोलिसांना आधीच सर्व काही सांगितले आहे, असे तो म्हणाला. माझे म्हणणे 15 दिवसांपूर्वी नोंदवले गेले.

सीसीटीव्ही फुटेजपासून ते निर्मात्याला पाठवलेले त्याचे मेसेज स्क्रीन शॉट्सपर्यंत, ते सर्व आमच्याकडे आहे. ते म्हणाले की या शोमधून 100 हुन जास्त लोकांची भाकरी अवलंबून आहे. या गोंधळात मला त्या लोकांचे आर्थिक नुकसान करायचे नाही. जेनिफरने सांगितलेली प्रत्येक गोष्ट निराधार आहे. त्यामुळे आता जेनिफर आणि तारक मेहता मधील मेकर्सचा वाद कोणत्या दिशेला जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.