Tata Motors ने Nexon Faceliftचे अनावरण केले, जाणून घ्या बुकिंग कधी होणार सुरु

Tata Motors – टाटा ग्रुपची ऑटो निर्माता कंपनी टाटा मोटर्सने नेक्सॉन फेसलिफ्टचे अनावरण केले आहे. कंपनी 14 सप्टेंबर रोजी Nexon आणि Nexon EV फेसलिफ्ट लॉन्च करेल. त्याचे बुकिंग ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यात पूर्वीसारखीच टर्बो-पेट्रोल, डिझेल इंजिने मिळतात. नेक्सॉन फेसलिफ्टमध्ये 10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल.

लॉन्च झाल्यानंतर, नेक्सॉन फेसलिफ्ट पुन्हा एकदा सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेटशी स्पर्धा करेल.दरम्यान, टाटा मोटर्सच्या एकूण विक्रीत 1 टक्क्यांची घट झाली आहे. ऑगस्टमध्ये एकूण विक्री 1.1% ने घटून 78,010 युनिट्सवर आली. एकूण विक्री 78,843 वरून 78,010 युनिट्सवर घसरली आहे.

देशांतर्गत विक्री 76,479 वरून 76,261 युनिट्सवर घसरली. याशिवाय, व्यावसायिक वाहनांची विक्री 1.9% ने वाढून 32,077 युनिट्सवर पोहोचली आणि एकूण PV विक्री 3% ने घटून 45,933 युनिट्सवर गेली. याशिवाय देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ३.५ टक्क्यांनी घसरून ४५,५१३ युनिटवर आली आहे.

येथे आणखी बातम्या वाचा-

Jalna Lathicharge Case : सुप्रिया ताई, सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्र पेटवू नका; चित्रा वाघ यांची विनंती

Maratha Reservation : आंदोलनाच्या वेळी झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी – शिंदे

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; शरद पवारांनी सांगितलं याला नेमकं कोण आहे जबाबदार

Jalna Lathicharge Case : राज ठाकरेंनी सरकारला झाप झाप झापलं; मराठा समाजाला केले ‘हे’ आवाहन