WWE मध्ये धुमाकूळ घालणारा भारतीय पैलवान वीर महान कोण आहे ?

नवी दिल्ली – डब्ल्यूडब्ल्यूईच्या जगात एका भारतीयाच्या नावाने खळबळ माजली आहे. ज्याचे नाव आहे रिंकू सिंग म्हणजेच वीर महान. उत्तर प्रदेशच्या वीर महान याने आपल्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. 125 किलो वजनाच्या रिंकू सिंगने 4 एप्रिल रोजी वीर महान म्हणून WWE च्या रिंगमध्ये पदार्पण केले असून त्या ठिकाणी तो जबरदस्त कामगिरी करताना दिसत आहे.

वीर महानचा लूक आणि स्टाइल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे ते म्हणजे. लांब दाढी, कपाळावर भस्म आणि लांब केस यामुळे तो इतर पैलवानांपेक्षा वेगळा दिसत आहे. रिंकूने छातीवर मोठ्या अक्षरात आई लिहिले आहे, तर हातावर राम लिहिले आहे. गमछा आणि काळे धोतर परिधान करून, रिंकूने आपल्या देशाची ओळख घेऊन रिंगमध्ये प्रवेश केला आहे. त्याला पाहून तो भगवान शिवाचा मोठा भक्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

उत्तर प्रदेशातील भदोहीच्या ज्ञानपूर येथील होलपूर गावात राहणाऱ्या 33 वर्षीय रिंकू सिंगचे वडील ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. चारही भावांमध्ये सर्वात लहान असलेल्या रिंकूचे बालपण गरिबीत गेले. लहानपणी रिंकूला भालाफेक आणि क्रिकेट खेळायची आवड होती. कुस्तीचे प्रशिक्षण रिंकूने लखनऊच्या गुरु गोविंद सिंग स्पोर्ट्स कॉलेजमध्ये घेतले. यानंतर आता तो WWE मध्ये धुमाकूळ घालत आहे. (Veer mahan info in marathi)