‘सम्मेद शिखर जी’ या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यास केंद्र सरकार कटिबध्द!

नवी दिल्ली : केंद्रीय कॅबिनेट मंत्री भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांनी जैन समाजाच्या श्रद्धेचा विषय असलेल्या ‘श्री सम्मेद शिखरजी तीर्थ’ या संदर्भात जैन समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना विशेष बैठकीसाठी आमंत्रित केले होते. या बैठकीला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री श्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते.

या बैठकीत जैन समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले व जैन समाजाच्या बाजूने लेखी आदेश काढू असे आश्वासन दिले.’सम्मेद शिखर जी’ या पवित्र तीर्थक्षेत्राबद्दलचे सर्व गैरसमज दूर करून सर्व समस्या दूर झाल्या आहेत. जैन समाजाच्या सर्व धार्मिकस्थळांचे आणि त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे आश्वासन त्यांना देण्यात आले असल्याचे, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले आहे.

उपस्थित शिष्टमंडळात महाराष्ट्र सरकारचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, मध्यप्रदेश सरकारचे मंत्री ओमप्रकाश सकलेचा आणि अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी, खासदार लहरसिंग सिरोया, माजी खासदार सतपाल जैन, युवा महासंघाचे अध्यक्ष सुनील सिंघी, आनंदजी कल्याणजी पेढीचे श्रीपाल शहा, नकोडा तिर्थाचे रमेश मुथा, भाजप जैन सेलचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, हितेश भाई मोटा, विश्व जैन संघटनेचे संजय जैन, अशोक पाटणी, (आरके मार्व्हल) दिल्लीचे आर. के. जैन, गजराज जैन गंगवाल, शिखरचंद जैन पहारिया मुंबई, संतोष पंदारे, अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय सहमंत्री सौरभ भंडारी, विपीन जैन, जे. के. जैन, उमेश जैन, विकास अच्छा, दीपक मेहता आदी उपस्थित होते.