‘योद्धा कधी पराभूत होत नसतो’, शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह येताच रोहित पवार भावुक !

मुंबई : राज्यासह देशभरात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेपासून अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रेटी हे देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले असल्याचे दिसून येत आहे. यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील आता कोरोनाच्या विळख्यात अडकले असल्याचे समोर आले आहे.

पवार यांनी याबाबत स्वतः ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट सकारात्मक आला असून काळजी करण्याचे काहीही कारण नसल्याचे पवार यांनी सांगितले आहे शरद पवार यांनी ट्विट करून लिहिले की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पण चिंतेचे कारण नाही. मी माझ्या डॉक्टरांनी सुचवलेल्या उपचारांचे पालन करत आहे. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो. स्वतःची चाचणी घ्या आणि आवश्यक ती सर्व खबरदारी घ्या.

त्यानंतर शरद पवार यांचे नातू आणि कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार हे भावनिक झाले आहेत. ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय. पण मला माहित्येय… योद्धा कधी पराभूत होत नसतो! तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत!’ असं भावनिक ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.