नेहा कक्करच्या कारला जमावाने घेरले, भीतीने गायिका ढसाढसा रडली

मुंबई : नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकताच या अभिनेत्रीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती अस्वस्थपणे रडताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलत आहेत.

बॉलिवूड गायिका नेहा कक्करचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती कारमध्ये बसून रडताना दिसत आहे. हा व्हिडिओ एका रेस्टॉरंटचा आहे, जिथून नेहा कक्कर जेवण करून बाहेर आली होती. नेहा कक्कर आपल्या कारमधून जात असताना अचानक काही मुलं तिथे आली आणि त्यांनी आवाज करायला सुरुवात केली.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही मुले नेहाकडे पैसे मागत होती, तेव्हा सुरक्षारक्षक तेथे आला. गार्डने मुलांना काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच आरडाओरडा सुरू झाला. हे बघून एवढा गोंगाट झाला की नेहा कक्करचे डोळे पाणावले. नेहा कक्कर खूपच घाबरली आणि कारच्या खिडकीकडे पाठ करुण ती रडताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते.