डॉ. जयंत खंदारेंच्या संशोधनामुळे कर्करोग निदान रक्तचाचणी मानवजातीसाठी ठरणार जीवनदायिनी

पुणे:- कर्करोगबाधित रुग्णांच्या रक्तातून सरक्युलेटिंग ट्युमर सेल्सला (सी टी सी) टिपणारी ऑन्कोडीक्सव्हर हि रक्तचाचणी डॉ. जयंत खंदारे यांनी विकसित केली आहे. भारतातील अश्या प्रकारची रक्तचाचणी हि पहिली व एकमेव चाचणी आहे. यामुळे अचूकपणे, कार्यक्षम पद्धतीने आणि अत्यंत कमी वेळेत हि चाचणी करता येणार आहे. गेली पंधरा वर्ष हे संशोधन कार्य पुणे आणि मुंबईमध्ये करण्यात आले. या संशोधनात कार्यासाठी मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलची भूमिका ही महत्वाची असून संशोधनासाठी त्यांचे सहकार्य मिळाले आहे. अशी माहिती मुकी वैज्ञानिक डॉ. जयंत खंदारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डायग्नेस्टीकप्रमुख डॉ. श्रीजा जयंत, लॅब प्रमुख डॉ. गौरीशंकर आळंद उपस्थित होते.

यावेळी हे संशोधन समाजभिमुख व्हावे यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने हि कर्करोग निदान चाचणी समजती सर्व स्तरापर्यंत पोहचावे यासाठी सहकार्य करावे. डॉ. खंदारे यांनी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतून (एनसीएल) पीएचडी पूर्ण केली असून अमेरिकेतून तीन पोस्ट डॉक्टरेट फेलोशिप आणि जर्मनीतील अॅलेक्झांडर वॉन हम्बोल्ड एक्सपिरियन्स्ड (एव्हीएच) फेलो आहे. मी २१ पेटंट अॅप्लिकेशन सादर केली असून समाजातील अपूर्ण गरजांसाठी असलेल्या तीन तंत्रज्ञानांचे हस्तांतरण केले आहे. शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकाशनांमध्ये माझे प्रबंध प्रकाशित झाले आहेत.

डॉ. खंदारे पुढे म्हणाले, आज भारतामध्ये ५०-६० लाख कर्करोगाचे रुग्ण भारतात आहेत. कॅन्स सेल फिल्टरेशन तंत्रज्ञान यावर आधारीत एका उपकरणाद्वारे रुग्णाच्या रक्तातून कर्करोगाच्या पेशी वेगळ्या करणे शक्य होते. कर्करोगाच्या पेशी (१० ते ३० मायक्रॉन आकाराच्या) या परिधीय रक्तामधून प्राथमिक अवयवातून दूरच्या अवयवाकडे स्थलांतरित होतात व त्याद्वारे कर्करोगाचा प्रसार (कॅन्सर मेटासिस) होतो. कर्करोगाने बाधीत लोकांपैकी ९० टक्के रुग्ण हे कॅन्सर मेटासिसचे निदान लवकर न झाल्यामुळे मृत्युमुखी पडतात. कॅन्सर मेटासिसचे निदान होण्याची मर्यादा कमी असल्यामुळे, पेट किंवा एमआरआय (सुमारे ८ ते १० मीलिमीटर) चाचणीमध्ये अशा पेशींचे अस्थित्वच लक्षात येत नाही व कर्करोगाचा प्रसार शरीरात जलदगतीने होत राहतो. अॉन्कोडिस्कव्हर टेस्ट ही ‘फर्स्ट इन क्लास’ लिक्विड बायोप्सी तंत्रज्ञानाधारित चाचणी असून त्याच्या यशस्वी वैद्यकीय चाचण्या मुंबईतील टाटा मेमोरियल हाॅस्पिटल (टीएमएच) – (डॉ पंकज चतुर्वेदी, सहायक संचालक, टीएमएच) येथे झाल्या आहेत. नव्याने आलेल्या मेडिकल डिव्हाईसेस रूल्स २०१७ अंतर्गत ड्रग्ज कंट्रोलर जनरल अॉफ इंडिया (डीसीजीआय) या संस्थेने उत्पादन आणि विपणनासाठी मान्यता दिलेले भारतातील हे प्रथम आणि एकमेव स्वदेशी वैद्यकीय उपकरण आहे. एफडीए महाराष्ट्र यांनी या कार्यासाठी भरीव मदत केली आहे.

भारतामध्ये तसेच बांग्लादेश, युरोप व कॅनडा या देशांमध्ये सुरू केल्या आहेत. आमचे संशोधन हे भारतातील तसेच अन्य देशातील कर्करोगग्रस्त रुग्णांचे जीव वाचविण्यासाठीच आहे. अशा स्वरुपाची चाचणी ही २००४ पासून अमेरिकेमध्ये १.४ लाख रुपयांपासून उपलब्ध आहे. त्यामुळे ती बहुतांश भारतीय कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी परवडणारी नव्हती हे निश्चित. भारतामध्ये संशोधन करून आम्ही ही किंमत पंधरा हजार रुपयांपर्यंत खाली आणली असून अचूकता आणि संवेदनशीलता यामध्ये कोठेही तडजोड केलेली नाही. आमच्या चाचणीसाठी सुमारे ४८ तासांचा कालावधी लागतो जो परदेशातील चाचणीच्या १० दिवसाच्या कालावधीच्या तुलनेत खूपच कमी आहे. या चाचणीच्या संशोधन कार्यासाठी, एआयआरला डीबीटी-बायरॅक (केंद्र सरकार) यांच्या मार्फत संशोधन अनुदानाच्या रकमेद्वारे आर्थित सहाय्य मिळाले.

श्री. डॉ हर्षवर्धन, माजी केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी ही चाचणी भारतामध्ये लाँच केली होती. तर केंद्र सरकारमधील वाणीज्य मंत्री पियुष गोयल यांनी आम्हाला २०१९ मध्ये ‘बेस्ट इनोव्हेटर इन हेल्थकेअर’ पुरस्काराने सन्मानित केले होते. युरोप व अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये स्क्रिनिंग आणि मॉनिटरिंगवर खूप मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येतो. त्यामुळे तेथे कर्करोगाच्या केसेसचे प्रमाण सर्वाधिक असले तरी रुग्ण दगावण्याचे प्रमाण फक्त ३० टक्के आहे, व तेच प्रमाण भारतात ६० टक्के एवढे जास्त आहे. त्यामुळे भारतात परवडणाऱ्या दरात कर्करोगाशी संबंधित आरोग्यसेवा देण्यासाठीचे महत्त्वाचे मानक म्हणून परवडणाऱ्या दरातील प्राथमिक टप्प्यातच रोगनिदान करणाऱ्या चाचण्यांकडे पाहायला हवे. एआयआरने अशी एक चाचणी विकसित केली असून त्याद्वारे महाराष्ट्र व भारतामध्ये परिणामकारक व परवडणाऱ्या दरात कर्करोगाशी संबंधित उपचार पुरवता येतील.