Devendra fadnavis : प्रभू श्रीरामांवर देवेंद्र फडणवीस यांचे गीत, अमृता फडणवीस गायिका…

Amruta Fadnavis:– भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने नमो चषक अंतर्गत नमो वॉकेथॉन चे आयोजन केले होते त्याप्रसंगी सौ. फडणवीस यांनी असे प्रतिपादन केले की महिला शक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर मी पहिल्यांदाच बघत आहे आपण महिला सर्वच आघाड्यांवर लढत असतो आपणच स्वतःची काळजी घेतली तरच आपले जीवन समृद्ध सशक्त बनेल भारतीय जनता पार्टी महिला आघाडीचे मी विशेष कौतुक करते की असा उपक्रम राबवून त्यांनी महिलांच्या मागे भारतीय जनता पार्टी सक्षमपणे उभी आहे हे दाखवून दिले. पुढे बोलताना फडणवीस म्हणाल्या उद्या श्रीराम मंदिर लोकार्पणानिमित्त देशात सगळीकडे भगवे वातावरण निर्माण झालेले आहे ही येणाऱ्या हिंदू राष्ट्राची नांदीच आहे.

शिवाजी मानकर

श्रीराम मंदिर लोकार्पणा निमित्त स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गाणे लिहिलेले असून त्याला अजय -अतुल यांनी संगीत दिलेले आहे तसेच त्यातली काही कडवी ही अमृता फडणवीस व देवेंद्र फडणवीस यांनी गायलेली आहेत अशी माहिती अमृता फडणवीस यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा