लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच होणार चर्चा

लोकसभा व विधानसभेच्या जागा वाटपाबाबत मविआमध्ये लवकरच होणार चर्चा

मुंबई – राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आजही भक्कम आहे. मागील तीन वर्षात मविआने भाजपाला धूळ चारत मोठे यश मिळवलेले आहे. मविआमध्ये जागा वाटपाविषयी कसलेही मतभेद नाहीत. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र बसून आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा करतील,असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Maharashtra Pradesh Congress Committee President Nana Patole)  यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत लोकसभा व विधानसभानिहाय चर्चा केली जाईल. सोलापूर लोकसभेची जागा ही काँग्रेसचीच आहे. या मतदारसंघातून मागील अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवत आहे आणि ही जागा काँग्रेसकडेच राहील असे स्पष्ट करत सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्ष ताकदीने उभा रहात आहे, जिल्ह्यात कोणताही गट-तट नाही, सर्वजण एकसंधपणे काम करत आहेत. तरुणही मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षात सहभागी होत असून जनतेच्या आशिर्वादाने जिल्ह्यात काँग्रेस पक्ष पुन्हा चांगली कामगिरी करेल.

विठ्ठला, राज्यातील बळीराजाचे अवकाळी पावसापासून रक्षण कर.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. चतुर्थीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन म्हणजे दुग्ध-शर्करा योग आहे. विठ्ठल-रुक्मिणी हे गरीब, सर्वसामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी जनतेचे दैवत आहे तसेच वारकरी संप्रदायाचे माहेर आहे. बळीराजा आज अस्मानी संकटाने घेरला असून असंवेदनशील खोके सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. आता विठ्ठलानेच बळीराजाचे अस्मानी, अवकाळी पावसापासून रक्षण करावे, अशी प्रार्थना केल्याचे पटोले म्हणाले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, सुधीर महाराज घोडके यांनी नाना पटोले यांचा तुळशीहार, उपरने आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला.

Total
0
Shares
Previous Post
Nana Patole

सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाचीच; जिल्ह्यात काँग्रेसची ताकद आणखी वाढेल – पटोले

Next Post
चिक्कार पैसा कमवायचा आहे, पण नेमके करावे काय हेच समजत नाही; तर ही बातमी नक्की वाचा!

चिक्कार पैसा कमवायचा आहे, पण नेमके करावे काय हेच समजत नाही; तर ही बातमी नक्की वाचा!

Related Posts
निर्भीड पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

निर्भीड पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

Attack on Dnyaneshwar Choutmal | पुण्यातील गोखलेनगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल आणि कॅमेरामन निखिल…
Read More
मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्यामुळे पगारी सुट्टीची गरज नाही; स्मृती इराणींचं वक्तव्यं

मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नव्हे, त्यामुळे पगारी सुट्टीची गरज नाही; स्मृती इराणींचं वक्तव्यं

Smriti Irani on Menstrual leave: केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळीदरम्यान महिलांसाठी सुट्टीवर एक…
Read More
Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पूलावर विचित्र अपघात, ट्रकची ८-९ वाहनांना धडक, गाड्या चक्काचूर

Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पूलावर विचित्र अपघात, ट्रकची ८-९ वाहनांना धडक, गाड्या चक्काचूर

Pune Navle Bridge Accident : पुण्यातील नवले पूलावरुन गाडी चालवायची म्हटलं की, भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण या पूलावर…
Read More