भारतासोबत चर्चेतून आम्हाला शाश्वत शांतता हवी आहे; पाकिस्तानी पंतप्रधानांची मस्ती जिरली ?

नवी दिल्ली-  पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांचा सूर बदलला आहे. भारतासोबत चर्चेतून शाश्वत शांतता हवी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. याचे कारण काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हाकोणत्याही देशाला पर्याय नाही. असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दीर्घकाळापासून खराब आहेत. पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे. भारताने तीन वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर दोघांमधील संबंध आणखी ताणले गेले आहेत.भारताने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केले. यावर पाकिस्तानने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.त्याने राजनैतिक संबंधांची पातळी खालावली.

आंतरराष्ट्रीय मंचावरही त्यांनी भारतावर टीका केली.जम्मू-काश्मीर हा नेहमीच भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील, असे भारत पाकिस्तानला सातत्याने सांगत आला आहे. पाकिस्तान जेव्हा दहशतवादाला प्रोत्साहन देणंथांबवेल तेव्हाच पाकिस्तानशी आपले संबंध सामान्य होऊ शकतील, असं भारतानं म्हटलं आहे.

दरम्यान, हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शरीफ म्हणाले की, पाकिस्तान आणि भारताने व्यापार, अर्थव्यवस्था आणि त्यांच्या लोकांच्या भल्यासाठी स्पर्धा केली पाहिजे. ते म्हणाले की, पाकिस्तान हाआक्रमक नाही. पण आपली आण्विक क्षमता आणि प्रशिक्षित सैन्य इतरांना आपल्यावर हल्ला करण्यापासून रोखते. पाकिस्तान आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्करावर खर्च करतो,असेही ते म्हणाले. कोणावरही हल्ला करणे हा त्याचा उद्देश नाही.

दरम्यान, मिडिया रिपोर्टनुसार पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. त्याच्याकडे परकीय चलनाच्या साठ्यात फारच कमी पैसा शिल्लक आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा दर गगनाला भिडला आहे.पाकिस्तान सरकार आयएमएफकडे आर्थिक मदत मागत आहे.