देशभरात समान नागरी कायदा लागू होणार? अमित शाह यांनीच दिले संकेत

भोपाळ – 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समान नागरी कायद्याबाबत देशात पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीच तसे संकेत दिले असून मोठ्याप्रमाणात या निर्णयाला पाठींबा मिळेल असं दिसत आहे.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ( 2024 Loksabha election preparation ) भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्याची ब्ल्यू प्रिंटही तयार झाली आहे. भोपाळमध्ये पोहोचलेले अमित शहा यांनी भाजप कार्यालयात कोअर कमिटीची ( Amit Shah BJP meeting ) बैठक घेतली. त्यात ते म्हणाले की, राम मंदिर, कलम ३७०, तिहेरी तलाक अशा मुद्द्यांवर भाजपला यश मिळाले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, की समान नागरी कायदा ( Amit Shah on common civil code ) लागू करण्याची तयारी सुरू ( Amit Shah in MP ) झाली आहे. उत्तराखंडमध्ये तयारी करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की उत्तराखंडमध्ये पायलट प्रोजेक्ट ( pilot project in Uttarakhand ) म्हणून समान नागरी कायदा लागू करण्यात येणार आहे. जांबोरी मैदानातही अमित शाह म्हणाले की, कलम ३७० असो, राम मंदिर असो किंवा अन्य कोणताही मुद्दा, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही वादग्रस्त मुद्दे सोडवले आहेत. आता संपूर्ण लक्ष समान नागरी ( Amit Shah on common civil code ) कायद्यावर आहे.