शरद पवार यांच्यासारखा नेता हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे त्यामुळे…; नाथाभाऊंनी केले पवारांचे कौतुक

कोल्हापूर – काल कोल्हापुरात (Kolhapur) झालेल्या सभेत माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपवर हल्लाबोल केला.आज राजकारणाची दिशा बदलली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) तर गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळ नवर्‍यासारखा झाला आहे अशी जोरदार टीका एकनाथ खडसे यांनी केली.

सरकारच्या मंत्र्यांवर, पदाधिकारी यांच्यावर धाडी टाकून बदनाम करायचे. आमचे फोन टॅप (Phone Tap) करण्यात आले. इतकी घाणेरडी निती राजकारणात कधी पाहिली नाही अशी खंतही एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. शरद पवार( Sharad Pawar) यांच्यासारखा नेता हिमालयासारखा खंबीरपणे उभा आहे त्यामुळे हे सरकार पाच नव्हे तर कायम सत्तेत येत राहिल.राष्ट्रपती राजवट लावून मागच्या दरवाज्याने सत्ता घेण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) सुरू आहे असेही एकनाथ खडसे म्हणाले.