रक्ताचं नातं आधी, राजकारण नंतर! पंकजा मुंडेंनी रुग्णालयात जाऊन घेतली धनंजय मुंडेंची भेट

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा ३ जानेवारीच्या रात्री भीषण अपघात (Dhananjay Munde Accident) झाला होता. ज्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आता त्यांच्या चुलतबहिण आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी मुंबईला गेल्या आहेत. यावेळी त्यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची (Pankaja Munde Met Dhananjay Munde) विचारपूस केली.

“धनंजय यांची आता तब्येत बरी आहे. त्यांचा अपघात झाला तेव्हा मी नाशिकला होते. मी आता नाशिकवरून आले म्हणून आज भेटायला आले”, धनंजय यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्यांना मी सांगितलं, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. वाहन वगैरे व्यवस्थित चालवा”, असं भेटीनंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंनी सांगितलं.

“मागे देखील धनंजय मुंडे ऍडमिट होते, तेव्हा मी भेटायला आली होती. मी तर बहीण आहे आणि सर्वच राजकीय नेतेमंडळी एकमेकांना भेटतात. ही राजकीय संस्कृती आहे”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.