अजितदादांनी घेतलेल्या भूमिकेला राज्यातील जनतेचा पाठिंबा – सुनिल तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फ्रंटल सेलची बैठक प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पार...

Sunil Tatkare – अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतलेल्या भूमिकेला राज्यातील जनतेचा पाठिंबा आहे. त्यामुळे कुठलाही संभ्रम मनात न ठेवता भक्कमपणे आपल्या भूमिकेवर आपण ठाम रहायचे आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी फ्रंटल सेलच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले.

आपली भूमिका तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जायला हवी. आपल्या फ्रंटल सेलच्या माध्यमातून ती पोचवायची आहे म्हणून ही बैठक असल्याचे सुनिल तटकरे यांनी यावेळी सांगितले.

२०१४ पासून पक्षात ज्या घडामोडी घडत आल्या त्यानंतरच हा मोठा निर्णय घेण्यात आला होता. अजित पवार व वरीष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखालीच हा निर्णय झाल्याचे सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. आपण भाजपबरोबर गेलो हे मोठे पाप केले असे काहीजण बोलत आहेत. परंतु का गेलो हेही लोकांना सांगणे महत्वाचे असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले.

शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांच्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम असल्याचे सांगतानाच मुस्लिम समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळायला हवे अशीही भूमिकाही आपली आहे हेही सुनिल तटकरे यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले. संघटनात्मक बांधणी आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोचण्यासाठी सर्वांनी मिळून काम करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज झालेल्या बैठकीत फ्रंटल सेलच्या प्रमुखांनी केलेले काम आणि भविष्यात काय काम करणार आहोत याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना दिली.

या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ,
प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, सरचिटणीस लतिफ तांबोळी, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, सेवादल राज्यप्रमुख राजेंद्र लावंघरे, सेवादल कार्याध्यक्ष शिवाजी बनकर, सामाजिक न्यायसेल राज्यप्रमुख सुनील मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक, इतर मागासवर्गीय सेलचे राज्यप्रमुख कल्याण आखाडे, राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. बाळासाहेब पवार, सांस्कृतिक सेलचे राज्यप्रमुख बाबासाहेब पाटील, मच्छीमार सेलचे राज्यप्रमुख चंदू पाटील, गड किल्ले संवर्धन सेलचे राज्यप्रमुख योगेश शेलार, हिंदी भाषिक सेलचे राज्यप्रमुख पारसनाथ तिवारी, रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या राज्यप्रमुख सौ. मेघा पवार, माजी सैनिक सेलचे राज्यप्रमुख दिपक शिर्के, वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख जितेंद्र सातव, सोशल मिडिया राज्यप्रमुख सुदर्शन जगदाळे, पश्चिम महाराष्ट्र युवती विभागीय अध्यक्षा सोनाली गाडे, उत्तर महाराष्ट्र युवती विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे, मराठवाडा युवती विभागीय अध्यक्षा अंकिता विधाते, राज्य युवती समन्वय संघटक स्मिता देशमुख, रायगड जिल्हा युवती अध्यक्षा ॲड. सायली दळवी, आदींसह पक्षाचे सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत