फक्त 634 रुपयांना मिळणार हा LPG सिलिंडर

वजनाने हलका आणि किंमतीत स्वस्त अशा किंमतीत गॅस सिलिंडर सध्या बाजारात चर्चेत आहे.बदलत्या जमान्याचा हा नवीन गॅस आहे. या गॅस सिलिंडरची किंमत 634 रूपये इतकी आहे.कंपोझिट गॅस सिलेंडर हा फक्त 10 किलोचा आहे.हा सिलेंडर संपूर्णपणे पारदर्शक आहे.कमी वजनामुळे हा एका जागेवरुन दुसऱ्या ठिकाणी सहज घेऊन जाताव येतो. कमी सदस्य असलेल्या कुटुंबासाठी हा गॅस सिलेंडर फायद्याचा ठरतो. हा कंपोझिट गॅस सिलिंडर लोखंडी गॅस सिलिंडर वजनाने सात किलो हलका असतो.

घरगुती गॅस सिलिंडर वजनाने 17 किलो असतो. कंपोझिट सिलिंडर तेवढाच गॅस असतो. त्यामुळे यांचे एकूण वजन 20 किलो एवढे आहे. लोखंडी गॅस सिलिंडरचे गॅस मिळून एकूण वजन 30 किलो पेक्षा जास्त आहे. नवीन ग्राहकांना कंपोझिट गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तर नवीन जोडणी करून घ्यावी. इंडेन ने या विषयी माहिती दिली आहे. त्यानुसार नवीन कंपोझिट गॅस सिलिंडर घ्यायचा असेल तर ग्राहकांना 10 किलोसाठी 3350 रूपये तर 5 किलोसाठी 2150 रूपये मोजावे लागतील.