आजचा अर्थसंकल्प उद्योगांसह शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगारांना दिलासा देणारा – रावसाहेब पाटील  

दिल्ली : सर्व प्रथम मी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सितारमन जी यांचे आभार मानतो की त्यांनी सर्व क्षेत्रांना स्पर्श करणार बजेट आज देशाला दिलं आहे. कोविड सारख्या महामारीवर मात करून पुन्हा देशाच अर्थचक्र रुळावर आणलंय. जगाची अर्थ व्यवस्था कोलमडली पण आपल्या देशाने अर्थव्यवस्थेत प्रगती केली आहे. असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

आजचा अर्थसंकल्प उद्योगांसह शेतकरी, कष्टकरी, मजूर, कामगारांना दिलासा देणारा आणि सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे. 2014 पासुन यासरकारने कर वाढवला नाही. पुर्वीच्या काळी दर बजेटमध्ये कर वाढवला जायचा हा एक प्रकारे दिलासाच तर आहे. सर्वात मोठी आणि दिलासादायक गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी रेल्वेला एक लाख सात हजार कोटी रुपयांचे बजेट होते. यावर्षी एक लाख सदोतीस हजार कोटी रुपयांचे बजेट रेल्वेसाठी दिले आहे.

महाराष्ट्रराज्यासोबतच सर्व देशभर सुरु असलेल्या रेल्वे प्रोजेक्टला यातूनच पैसा दिला जाणार असुन सोबतच आत्ता जी काही नविन कामे हाती घ्यायची आहेत जसे की दुहेरीकरण, इलेक्ट्रिफिकेशन, स्टेशन डेव्हलपमेंट सह अनेक कामासाठी पैसा दिला जाणार आहे. असे मंत्री श्री दानवे यांनी शेवटी सांगितले.