दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू चोर बाजारातला – सामना 

मुंबई –  आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून न्यायव्यवस्थेवर आणि सरकारच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.  केंद्रीय तपास यंत्रणांचे गेल्या सात वर्षातील वर्तन एकतर्फी व राजकीय दबावाने प्रेरित आहे. न्यायाचा तराजू हलतो आहे व सत्याची गळचेपी सुरू आहे. अशा वेळेला न्यायालयांनी जनतेचा आवाज बनायला हवे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी न्यायालयांनाच पुढे यावे लागेल. पण आज हे सगळेच लोक बडे किंवा छोटे गुलाम बनून अंधभक्तीचा सूर आवळीत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.

‘परमबीर सिंग प्रकरणांचा तपास राज्याकडून सीबीआयकडे गेला हा ठाकरे सरकारला धक्का वगैरे असल्याचा ‘नाच’ विरोधक करीत आहेत. ते सर्वस्वी चूक आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकाराच्या अधिकारांवरील आक्रमण समोर आले. दिल्लीच्या हातातील न्यायाचा तराजू हा खरा नसून चोर बाजारातला आहे हे उघड झाले.’ अशा शब्दात शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे.

लोकांना शंका व्यक्त करण्याचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचे गेल्या सात वर्षांतील वर्तन एकतर्फी व राजकीय दबावाने प्रेरित आहे. असं देखील या अग्रलेखात म्हटले आहे. दरम्यान, आता भाजपकडून या टीकेला नेमके काय उत्तर दिले जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.