देश में आई नई आंधी, नाम है उसका राहुल गांधी – जितेंद्र आव्हाड

नवी दिल्ली : मानहानीच्या खटल्यात दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्थगिती दिली. या आदेशामुळे राहुल गांधी यांचा लोकसभेतील पुन:प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, लोकसभा सचिवालयाला त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. पी. व्ही संजय कुमार (Supreme Court Justice Bhushan Gavai, Justice P. S. Narasimha and Nya. P. V Sanjay Kumar) या तीन सदस्यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी झाली.

दरम्यान, या घडामोडींवर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, राहुल गांधी यांना मा. सर्वोच्च न्यायालयाने (SC)  दिलासा दिला अशी बातमी कानावर आली. आणि सहज माझ्या मनात घोषणा आली. “देश में आई नई आंधी, नाम है उसका राहुल गांधी”.

मला आठवतं की, 1980 साली वसंतराव साठे यांच्या तोंडातून निघालेली एक घोषणा होती “न जात पर-न पात पर, इंदिरा जी की बात पर, मुहर लगेगी हाथ पर” ही घोषणा देशभरात गेली. माझी खात्री आहे की, “देश में आई नई आंधी, नाम है उसका राहुल गांधी”. ही घोषणा देखिल देशभरात जाईल. कारण आता नवीन वादळाला सुरुवात झाली आहे. असं आव्हाड यांनी म्हटले आहे.