तृप्ती देसाईंनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची व्यक्त केली इच्छा; म्हणाल्या, ‘जर पक्षाने ऑफर..’.

बारामती- भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मला राजकारण, समाजकारणात काम करत असताना केवळ विधानसभा आमदार किंवा विधान परिषद आमदार व्हायचे नाही. तर राज्यातील तळागळातील सर्वसामान्य महिलांसाठी काम करायचे आहे. सध्या मी भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावागावात काम करत आहे. पण, उद्या एखाद्या पक्षाने जर ऑफर दिली तर त्या पक्षात प्रवेश करेल, असे यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

सध्या राज्याच्या राजकारणात महिलांचे काम दुटप्पी आहे. एखाद्या विरोधी पक्षातील नेत्या, कार्यकर्त्यांने2 चुकीचे काम केले तर त्याच्यावर तुटून पडतात. परंतु, सत्ताधारी पक्षातील नेत्याने बलात्कार किंवा अन्य कोणतेही वाईट कृत्य केले तर या महिला बघ्याची भूमिका घेत आहेत. ही वृत्ती अत्यंत वाईट आहे. मला अशा पद्धतीने काम करणे जमणार नाही, अशी अप्रत्यक्ष टीका तृप्ती देसाईंनी भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर केली आहे.

तसेच मी जी सत्याची बाजू असेल ती घेऊन काम करेल. त्यामुळे मी विधानसभा किंवा विधान परिषदेत गेल्यावर फक्त तेवढ्या पुरतेच मर्यादित न राहता तळागळातील महिलांपर्यंत पोहोचणार आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार आहे, असे तृप्ती देसाईंनी स्पष्ट केले आहे.