‘उद्धव ठाकरे,फडतूस नही मैं काडतूस हूँ मैं…याँद रखना, झुकेगा नही,मैं तो घुसेगा…’

Thane – ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshani Shinde) यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. यानंतर ठाण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस गृहमंत्री म्हणत त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.

दरम्यान, ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी “उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं”, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ते  काल नागपुरात सावरकर गौरव यात्रेत बोलत होते. “आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री. उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं, झुकेगा नहीं साला घुसेंगा. अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना उत्तर दिलं आहे.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांबद्दल माझ्या मनात यत्किंचितही सन्मान राहू शकत नाही. सावरकर गौरव यात्रा तोपर्यंत सुरु राहील जो पर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदुचे लोकं सावरकरांचा अपमान करत राहतील तोपर्यंत सावरकर प्रेमींची  यात्रा सुरु राहील”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.