शरद पवारांचा राजीनामा म्हणजे नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व स्विकारण्याची स्क्रीप्ट ?

Sharad Pawar Resigns : – ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. यानंतर आता शरद पवार हे त्यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर फेरविचार करणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना या मुद्द्यावर सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. यातच आता भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांची देखील प्रतिक्रिया आली आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजींचे नेतृत्व स्विकारण्याची स्क्रीप्ट ! असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष लक्ष्य केले आहे.