‘भाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या त्रासाने होणारी राज ठाकरेंची तडफड संपूर्ण देश व महाराष्ट्र बघत आहे’

  मुंबई –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे  ( Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray ) यांची बहुचर्चित सभा नुकतीच पार पडली. आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याने अवघ्या देशाचे लक्ष राज ठाकरे यांनी स्वतःकडे वेधून घेतले असताना आज राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे  सर्वांचे लक्ष होते. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर जातीयवादाचा आरोप करत आपल्या खास शैलीत समाचार घेतला. सोबतच भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही.  4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, कालच्या भाषणांनंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीकडून टीका होऊ लागली आहे. राज यांच्या भाषणावर  प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant Varpe) यांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेनंतर काही ट्विट्स केले असून यामधून त्यांनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय. “राज ठाकरेंचे मूळ दुखणे हे आपला भाऊ मुख्यमंत्री व पुतणे मंत्री झाल्याचे असून, वरून ते पवार साहेबांमुळे (शरद पवारांमुळे) झाले याचे दुःख अजूनचं जास्त आहे. भाऊ मुख्यमंत्री झाल्याच्या त्रासाने होणारी तडफड संपूर्ण देश व महाराष्ट्र बघत आहे,” असा टोला वरपे यांनी लगावला आहे.

अन्य एका ट्विटमध्ये वरपे यांनी, “राज ठाकरे एवढे बेबींच्या देठापासून मोदी सरकारमुळे वाढलेल्या पेट्रोल-डिझेल, महागाई, ढासळलेली अर्थव्यवस्था यावर बोलले असते तर थोडंफार पक्षाकडे मतदान तरी वळले असते. यावरून सुपारी कोणाची आहे हे कळतंय,” असंही म्हटलंय.