नाग समजून पूजा केली पण तो डसला, उद्धव ठाकरेंचा नाव न घेता संतोष बांगरांवर हल्ला

हिंगोली- हिंगोलीतील रामलीला मैदानावर आज झालेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शिंदे गटात गेलेले आमदार संतोष बांगर (Sanjay Bangar) यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.

गद्दार अनेक झाले पण हिंगोली कायम शिवसेनेच्या मागे उभी राहिली. आजही काही गद्दार आहेत. बेंडकुळ्या दाखवत आहेत. पण त्या बेडकुळ्यांमध्ये हवा आहे. ताकद माझ्याकडे आहे. मध्ये नागपंचमी झाली. मी गद्दारांवर माझा वेळ घालवणार नाही. काही जणांना वाटत असेल मी त्यांच्यावर बोलेल. पण मी बोलणार नाही. गद्दाराला नाग समजून पूजा केली पण त्यांनी आपल्यावर फणा काढला. या गद्दारांना जनता जागा दाखवेल. लोकांनी उद्धटपणा केल्यास त्यांना जागा दाखवा. नाग समजून पूजा केली पण तो डसला, असा टोला उद्धव ठाकरे यांनी संतोष बांगर यांना लगावला.