SreesanthvsGambhir : शेवटी संस्कार महत्वाचे… गंभीर प्रकरणावर श्रीसंतच्या पत्नीची कमेंट व्हायरल

Sreesanth On Gautam Gambhir: भारताचे दोन माजी क्रिकेटपटू श्रीशांत आणि गौतम गंभीर (Sreesanth-Gambhir Fight) यांच्यातील वाद थांबत नाही आहे. आता श्रीशांतने आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि थेट सामन्यादरम्यान गंभीरने मैदानाच्या मध्यभागी काय म्हटले होते ते सांगितले, ज्यामुळे प्रकरण आणखीनच चिघळले होते. श्रीशांतच्या म्हणण्यानुसार, गंभीरने त्याला ‘तू फिक्सर है… तू फिक्सर है’ म्हणत त्याला शिवीगाळ केली होती. श्रीशांत म्हणाला की, मी गंभीरला काहीही बोललो नाही आणि फक्त तो का रागावला आहे असे विचारत होता. श्रीशांतच्या या आरोपांवर गंभीरने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आता या वादात श्रीशांतची पत्नी भुवनेश्वरीने उडी घेतली आहे. तिने गंभीरचे थेट संस्कारच काढले.

दरम्यान, श्रीशांतने त्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टवर श्रीशांतची पत्नी (Sreesanth Wife) भुवनेश्वरी श्रीशांतने (Bhuvneshwari Sreesanth) देखील प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, ‘श्रीकडून हे सर्व ऐकल्यानंतर मला धक्कात बसला. भारताकडून जो खेळाडू तुमच्यासोबत इतके वर्ष खेळला तो या पातळीवर घसरला आहे ते ही निवृत्तीनंतर इतक्या वर्षांनी हे घडतंय.’

‘शेवटी संस्कार खूप महत्वाचे आणि ते मैदानावरील अशा प्रकारच्या वर्तणुकीवरून दिसून येतात. खूप धक्कादायक.’

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम