उद्धव ठाकरेंनीही माझ्यासोबत शिंदे गटात प्रवेश करावा – दिपाली सय्यद 

मुंबई – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. मला एकनाथ शिंदे यांनी राजकारणात आणलं. ते जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेल. लवकरच माझा शिंदे गटात प्रवेश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

माझी पक्षप्रवेशाची तारीख ठरली होती ती पुढं गेली आहे. लवकरच माझा प्रवेश होईल. भाजपचा नकार नाही स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. माझी इच्छा आहे उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करावा. माझ्या मंचावर उद्धव ठाकरे उपस्थित असतील.

यावेळी दीपाली सय्यद यांनी म्हटले की, यापूर्वीच माझा शिंदे गटात प्रवेश होणार होता. त्याची तारीखही जाहीर झाली होती. तेव्हा काहीतरी अडचण आली आणि माझा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. मग वेगळ्या पद्धतीने पक्षप्रवेश करण्याचे ठरले. त्यासाठी मी थांबले आहे. ठाकरे गटात एकत्र काम करण्याच्या माझ्या इच्छेला साथ मिळाली नाही. त्यामुळे मी तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पण माझी इच्छा आहे की, उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात प्रवेश करावा. मी जबाबदारीने सांगते की, माझ्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरे हे स्टेजवर असतील, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले.