कागल येथील शेतकऱ्यांच्या लाक्षणिक उपोषणास राजे समरजीतसिंह घाटगे यांचा पाठिंबा…

कागल – महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कागल शहरातील प्रस्तावित अन्यायी विकास आराखड्याच्या विरुद्ध कागल शहरातील शेतकऱ्यांनी केलेल्या एक दिवसीय लाक्षणिक उपोषण स्थळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी भेट देऊन पाठींबा दिला.

यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले, या विकास आराखड्यामध्ये शेतकऱ्यांचेवर अन्याय होत आहे. या शेतकऱ्यांनी राजकारण विरहितपणे एकत्र येऊन एक शिष्टमंडळ तयार करावे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या शिष्टमंडळाची लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी भेट घडवून आणू. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या विकास आराखडयास आमचाही विरोध आहे. नगरपालिकेमधील त्यावेळीच्या कारभारी मंडळींनी व नेत्यांनी आपल्या जवळच्या मंडळींचे गुंठेवारीचे धंदे चालवण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यावर अन्याय केला आहे.भविष्यात नगरपालिकेत आमची सत्ता आल्यानंतर पहिल्या सभेमध्ये या अन्यायी आरक्षणास विरोधाचा ठराव पास करून या शेतकऱ्यांना दिलासा देऊ.

या प्रश्नात लक्ष घालावे व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. अशा आशयाचे निवेदन मला कागल मधील शेतकऱ्यांनी कालच दिले आहे . त्यानंतर मी सी.ओ यांच्याशी या विषयावर बोललो आहे.  या प्रश्नावर  शेवटच्या क्षणापर्यंत मी शेतकऱ्यांच्यासोबत ठामपणे उभा राहणार आहे. शेतकऱ्यांनी मुदतीत हरकती घ्याव्यात.

https://youtu.be/Jxl-PvjRxzw