अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक ; विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला सभात्याग…

मुंबई – विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका गंभीर प्रश्न असताना संबंधित बालविकासमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगणार आहेत असे बोलत असतील तर या मंत्र्यांना इथे उत्तर देण्याचा काय अधिकार आहे असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधन वाढीचा प्रश्न सभागृहात आमदार पोटतिडकीने विचारात असताना बालविकास मंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याने विरोधी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.राज्यातील अंगणवाडी सेविकांना १५ हजार रुपये मानधन आणि मदतनीसांना १० हजार रुपये मानधन देणार का? असा सवालही अजित पवार यांनी मंत्र्यांना केला. दरम्यान अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला.