पोलीस सुरक्षा सोडून मैदानात या; ठाकरेंचं नार्वेकर-शिंदेंना ओपन चॅलेंज

uddhav-thackeray open challenge to eknath shinde and rahul narvekar – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे (Rahul Narvekar and Eknath Shinde) यांना पोलीस सुरक्षा सोडून जनतेच्या समोर येण्याचं चॅलेंज दिलं.

ते म्हणाले, “माझं तर आव्हान आहे नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावं. पोलीस प्रोटोक्शन घ्यायचं नाही. मीही एक पोलीस घेणार नाही. तिथे नार्वेकर यांनी सांगावं शिवसेना कुणाची. मग जनतेने सांगावं कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा. माझ्यात हिंमत आहे. माझी तयारी आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणार. लायकी आहे का? गर्दीत गारद्यांच्या शामील रामशास्त्री… सुरेश भट म्हणतात. आता मेल्याविन मढ्याला उपायच नाही. दुसरा उपायच नाही. आपण फक्त मढं पाहणार की लोकशाहीच्या खुन्यांचं मढं करणार? म्हणजे राजकारणात. एकूणच जी काही थट्टा सुरू आहे. घटना नाही, घटना नाही… हे काय आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

‘मी मृतदेह पिशवीत नेला, पण मी मुलाची हत्या केली नाही’, सूचना सेठचा दावा

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका

बजरंग बली व राम हा आपल्या सर्वांबरोबर आहे; जयंत पाटलांचा दावा