राम मंदिराच्या कार्यक्रमाप्रमाणे गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? 

sharad pawar on Ram Mandir    – देशातील सध्याच्या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण देशातील लोकांची भूक मिटवणाऱ्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत. अशी चुकीची धोरणं घेणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

निपाणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा तसेच नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलत होते.

शरद पवार म्हणाले की, मी कृषीमंत्री झालो तेव्हा लातूरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समजली. मी तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंहांना भेटलो. त्यांना म्हंटले आपण या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटलो. दुसऱ्या दिवशी दिल्लीवरुन नागपूरला आलो, तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही तेथे विचारलं तर कळालं की, आधीच डोक्यावर कर्ज, त्यात दुष्काळी परिस्थिती आली. अशातच शेतकऱ्यांवर सावकाराने कारवाई करत त्याच्या घराचा लिलाव काढला. या चौहुबाजुने आलेल्या संकटामुळे त्या शेतकऱ्यांनी वीष प्राशन करून आत्महत्या केली. शेतकऱ्यांचा सन्मान राहला नाही की ते जीव देतात, तीच परिस्थिती आजसुद्धा आली आहे.असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, त्या शेतकरी आत्महत्येनंतर रिझर्व्ह बॅंकेकूडन माहिती घेतली की, देशातील किती शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. तर माहिती आली की, ७२ कोटी. यावेळी एका क्षणाचाही विचार न करता ७२ कोटींचं कर्ज माफ करून टाकलं. परंतु आज त्या शेतकऱ्याकडे कुणी ढुंकून पाहत नाही, कंदा उत्पादक, हरभरा उत्पादक शेतकरी संकटात असतानाही त्यांच्याकडे कुणी बघत नाही. मी कृषीमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अमेरिकेतून धान्य मागविण्यासाठीच्या परवानगीची पहिली फाईल आली. मला ही गोष्ट खटकली. तिथून तीन वर्षात शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली. मागेल तेवढे धान्य शेतकऱ्यांना मिळू लागले.  जगातील १८ देशांना भारत धान्य निर्यात करु लागला. पण आज शेतकऱ्यांकडे ढुंकूनही बघितले जात नाही असेही शरद पवार साहेब यांनी म्हटले.

शरद पवार म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात झाला. मग काही लोक कोर्टात गेले. आता निर्णय आला. मंदिर निर्माण होत आहे. पण रामाच्या नावाचा वापर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून राजकारणासाठी होत आहे. धार्मिकतेच्या राजकारणाचा वापर आज अधिक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० दिवस उपवास करणार आहेत. त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. पण गरिबी हटवण्यासाठी त्यांनी काही केले असते तर बरं झालं असतं असे शरद पवार साहेब म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, आज एका चांगल्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला आहात. रत्नाप्पा आण्णा कुंभार यांच्या पंचगंगा कारखान्यात रावसाहेब पाटील १० वर्षे संचालक होते. तसे निपाणी परिसरात व्हावे यासाठी त्यांनी प्रयत्न करत इथं सहकार रुजवला. साखर उद्योगाबरोबर सोसायट्या उभा केल्या. त्यांच्या विश्वासावर १८०० कोटींच्या ठेवी लोकांनी ठेवल्या. मी कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. पण आज देखील शेतकरी कर्जात आहे. कर्जमाफीसाठी आम्ही या सरकारकडे वारंवार प्रयत्न करतोय असेही शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, अयोध्येचा जय श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. इथली मशीद पडल्यानंतर इथं राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या वेळी झाला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते शिलानेस झाला. राम मंदिराचे काम राहिले बाजूला, मात्र आता भाजप आणि आरएसएस याचा मतांसाठी फायदा करून घेत आहेत. राम मंदिराच्या कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? मोदी १० दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास त्यांनी देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी करावा असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

‘मी मृतदेह पिशवीत नेला, पण मी मुलाची हत्या केली नाही’, सूचना सेठचा दावा

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका

बजरंग बली व राम हा आपल्या सर्वांबरोबर आहे; जयंत पाटलांचा दावा