उमरान मलिकचा वेग सनरायझर्स हैदराबादला महागात पडला, शेवटच्या 2 सामन्यात 100 धावांची उधळण 

मुंबई –  दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात (Delhi Capitals VS Sunrisers Hyderabad) सनरायझर्स हैदराबादचा 21 धावांनी पराभव (Defeated by 21 runs) झाला. हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने (Umran Malik) या सामन्यात मोठा विक्रम मोडला. भारतीय गोलंदाज म्हणून त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान चेंडू (The fastest ball in history) टाकला. उमरानने ताशी 157 किलोमीटर वेगाने चेंडू टाकला. पण यासोबतच तो संघासाठी महागडा ठरत आहे. हैदराबादसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते.

उमरानने गेल्या 2 सामन्यात 100 धावा दिल्या आहेत. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 षटके टाकली आणि 52 धावा दिल्या. तर त्याला एकही विकेट घेता आली नाही. याआधी चेन्नई सुपर किंग्जविरुद्धही (against Chennai Super Kings) तो महागडा ठरला होता. उमरानने चेन्नईविरुद्ध 4 षटकात 48 धावा दिल्या. यासोबतच त्याला एकही विकेट घेता आली नाही. उमरानच्या वेगवान गोलंदाजीचे खूप कौतुक होत आहे. मात्र ते महागडे ठरणे हैदराबादसाठी अडचणीचे ठरले आहे.

विशेष म्हणजे उमराणची एकूण कामगिरी प्रभावी ठरली आहे. पण शेवटचे २ सामने त्याच्यासाठी चांगले नव्हते. उमरानने या मोसमातील 10 सामन्यांत 15 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने एकदा 4 आणि एकदा 5 विकेट्स घेतल्या. उमरानची एका सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 25 धावांत 5 विकेट घेणे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमरानला अजून फारसा अनुभव नाही. त्याने याआधी आयपीएल 2021 मध्ये फक्त 3 सामने खेळले होते.