संभाजी भिडेवर कारवाईसाठी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करणार – रामदास आठवले 

सोलापूर – भीमा कोरेगाव हिंसाचार(Bhima Koregaon Violence) प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide of Shiv Pratishthan) यांच्या विरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तपासामाध्ये संभाजी भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभाग आढळला नसल्याच पोलीसांनी न्यायालयात (In court) सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्य मानवी हक्क आयोगालाही (State Human Rights Commission) त्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आलीय. (pune News)

दुसऱ्या बाजूला या प्रकरणात ज्या इतर 41 आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र (Indictment) दाखल करण्यात आले आहे.1 जानेवारी 2018 ला भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडेंचा हात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर( Prakash Ambedkar chief vanchit bahujan Aaghadi ) यांच्यासह आणखी काही पुरोगामी संघटनांनी (progressive organizations) केला होता. हे आरोप केल्यानंतर संभाजी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.याप्रकरणी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेना क्लिन चिट मिळाली असेल तर कारवाईसाठी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करु. मात्र, संभाजी भिडेंवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे, असे आठवले यांनी म्हटले आहे. ते सोलापुरात (Solapur) प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ( Minister Ramdas Athawale On Sambhaji Bhide ) होते.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे (Raj Thackeray) हे सातत्याने झेंड्याचे आणि स्वतःच्या भूमिकांचे रंग बदलत आहेत. आता ते भगवा रंग अंगावर घेऊन समाजात द्वेष माजवण्याचे कार्य करत आहेत. वास्तविक पाहता भगवा रंग हा शांतीचा, वारकरी सांप्रदायाचा रंग आहे, हे त्यांनी ध्यानात घ्यावे. राज ठाकरेंच्या भोंग्या (Loudspeaker) संबंधातील भूमिकेशी आम्ही अजिबात सहमत नाही.