‘तुला मारू मारू तुझा जीव घेऊ’; अतरंगी कपड्यांमुळे उर्फी जावेदला जीवे मारण्याची धमकी

Uorfi Javed Gets Death Threat: अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद (Uorfi Javed) ड्रेसिंग सेन्समुळे आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. पण सध्या उर्फी जावेद एका मोठ्या कारणाने चर्चेत आहे. उर्फी जावेदने सोशल मीडियावर खुलासा केला आहे की, तिला अज्ञात कॉलरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे आता उर्फी जावेदने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

उर्फी जावेदला धमक्या मिळाल्या
रविवारी (16 एप्रिल) उर्फी जावेदने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडल स्टोरीमध्ये या प्रकरणाशी संबंधित माहिती शेअर केली आहे. उर्फीच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक व्हिडिओ देखील आहे, ज्यामध्ये उर्फी जावेद स्वतःला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा करताना दिसत आहे.

‘कोणीतरी मला चित्रपट निर्माता नीरज पांडेच्या ऑफिसमधून फोन केला आणि मला बोलत असलेला व्यक्ती त्यांचा असिस्टंट असल्याचा त्याने सांगितले. नीरज पांडेंना मला भेटायचे आहे, असे त्या व्यक्तीने मला सांगितले. म्हणून मी म्हणाले की मिटिंगपूर्वी प्रोजेक्टबाबत सर्व माहिती घ्यायला मला आवडेल. यावर कथित असिस्टंट संतापला आणि म्हणाला नीरज पांडेचा अपमान करण्याची माझी हिम्मत कशी झाली? त्याने मला सांगितले आहे की त्याला माझ्या कारचा नंबर आणि सर्व काही माहित आहे आणि मी ज्या प्रकारचे कपडे घालते, त्यामुळे मला मारू मारू माझा जीव घेतला जाईल. मी डिटेल्सशिवाय मीटिंगला उपस्थित राहण्यास नकार दिल्याने त्यांनी मला अशा धमक्या दिल्या.’ अशी माहिती उर्फीने दिली.

‘ माझ्या आयुष्याचा आणखी एक दिवस आणि मला आणखी धमक्या मिळाल्या आहेत. आजारपणातही मी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी आले आहे,’ असेही ती व्हिडिओत म्हणते आहे.