घरबसल्या आधार कार्डवरील मोबाइल नंबर असा करा अपडेट

आधार कार्ड सध्या सर्व भारतीयांची एकमेव ओळख बनला आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला इतर कोणतीच कागदपत्रे लागत नाहीत. अनेक महत्वाच्या कामासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड मागितले जाते. आधार कार्डवर व्यक्तीचे नाव, मोबाइल नंबर आणि बायोमेट्रिक डेटा असतो. अनेकदा आधार काढताना आपण सहज घरातील कोणाचीही नंबर दिलेला असतो , पण आता आपल्याला योग्य मोबाइल नंबर देण्याचे महत्व समजते. त्यामुळे आता योग्य मोबईल नंबर रजिस्टर असणे अनिवार्य आहे. पण आधार कार्डवरील मोबाइल नंबर बदलणे खूप जिकरीचे वाटते. आजच्या लेखात आपण घरबसल्या तुम्ही तुमचं मोबईल नंबर कसा बदलू शकता हे पाहणार आहोत. ही पद्धत वापरुन तुम्ही तुमच्या आधार कार्डवरील नंबर अवघ्या काही मिनिटांत अपडेट करू शकता.

सर्वात प्रथम ask uidai gov in या सरकारी वेबसाइटवर जा. तिथे तुम्हाला हवा असलेला मोबाइल नंबर म्हणजेच तुम्ही सध्या वापरत असलेला मोबाइल नंबर टाका.त्या नंतर तिथे तुम्हाला कॅप्चा टाइप करा. तुम्ही जो मोबईल नंबरवर जो ओटीपी येईल तो अपलोड करा. त्यानंतर तुमच्या समोर एक फॉर येईल त्यामध्ये तुमचे नाव, लिंग, मोबाइल नंबर, पत्ता . तिथे तुमचा अचूक मोबाइल नंबर भरा. तुम्हाला अजून इतर कोणती माहिती भरायची असेल तर ती देखील भरा. त्या नंतर एक नवीन पेज समोर येईल त्या ठिकाणी समोर आलेला कॅप्चा एंटर करा.पुन्हा तुम्हाला एक ओटीपी पाठविण्यात येईल. तो ओटीपी भरा आणि सेव्ह अँड प्रोसीडवर क्लिक करा.तुमचा मोबईल नंबर अपडेट होईल.