‘उत्तर भारतीयांना पाठिंबा देणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला उत्तर भारतीयांनी मुंबई महापालिका निवडणुकीत साथ द्यावी’

मुंबई – मुंबईतील उत्तर भारतीयांच्या संकटात रिपब्लिकन पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे.उत्तर भारतीयांच्या प्रश्नांवर नेहमी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  रामदास आठवले यांनी उत्तर भारतीयांना साथ दिली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती होणार असून आरपीआय उत्तर भारतीयांनाही मुंबई मनपा निवडणुकीची उमेदवारी देणार असल्याची घोषणा  रामदास आठवले यांनी केली असल्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांनी रिपब्लिकन पक्षाला साथ देऊन रिपब्लिकन पक्षाचे नगरसेवक निवडुन आणावेत असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी नुकतेच केले.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हानिहाय मेळावे मुंबईत आयोजित करण्यात आले असून नुकताच  ईशान्य मुंबईचा मेळावा संपन्न झाला. उद्या दि.11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता  भीम छाया सांस्कृतिक केंद्र सांताक्रूझ पूर्व येथे उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना. रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; माजी आमदार सुमंतराव गायकवाड; राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला ,मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,तानाजी गायकवाड,ऍड.आशाताई लांडगे आदी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तसेच दि.13 डिसेंबर रोजी रिपाइं चा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा मेळावा जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर 5 जानेवारी ला  उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा; दि.10 जानेवारी दक्षिण मुंबई जिल्हा आणि उत्तर मुंबई  या जिल्ह्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यांना केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले; राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या  तयारीसाठी रिपब्लिकन पक्षाची समिती रामदास आठवले यांनी नियुक्त केली असून त्यात अविनाश महातेकर,गौतम सोनवणे, सुमंतराव गायकवाड,कृष्णमिलन शुक्ला,लखमेन्द्र खुराणा,एम एस नंदा, जयंतीभाई गडा  आणि मुंबईतील 6 जिल्हा अध्यक्षांचा समावेश करण्यात आला आहे.