भारती सिंहने दिली खुशखबर, लवकरच घरात एक छोटा पाहुणा येणार आहे

 दिल्ली: कॉमेडियन भारती सिंगने तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. भारतीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर गरोदरपणाची माहिती दिली आहे. आपल्या घरी लवकरच एक छोटासा पाहुणा येणार आहे, हे तीने स्वतः मोठ्या आनंदाने जाहीर केले आहे.

अनेकदा तिचे चाहते भारतीला विचारत असतात की ती गुड न्यूज कधी सांगत आहे? भारती स्वतः अनेकदा आई होण्यासाठी स्वतःला तयार केले. पण आता हि कॉमेडियन खऱ्या अर्थाने चाहत्यांना खुशखबर देणार आहे.

हा व्हिडिओ शेअर करत भारतीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे आमचे सर्वात मोठे सरप्राईज होते, का थांबायचे… आता सबस्क्राईब करा.’ भारतीच्या या पोस्टवर आता सर्वसामान्य लोक सेलेब्स  तिचे अभिनंदन करत आहेत.

आज सकाळी मीडियामध्ये बातम्या आल्या की भारतीचा हा फक्त प्रारंभिक टप्पा आहे, त्यामुळे तिने तिची सर्व कामे थांबवली आहेत. एवढेच नाही तर ती आता घराबाहेरही पडत नाही. या बातमीत असेही सांगण्यात आले होते की, कॉमेडियनने निरोगी गर्भधारणेसाठी वजन कमी केले होते. भारती आणि हर्ष हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कॉमेडियन आणि अँकर आहेत. सध्या भारती कपिल शर्माच्या शो ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसत आहे. अलीकडेच ही जोडी बिग बॉस 15 मध्येही दिसली होती.