Kasba Peth : कसबा पेठ विधानसभा मतदार संघात ३ लाख ८० हजार रुपये जप्त

Kasba Peth : पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत दुपारच्या सुमारास ३ लाख ८० हजार ५०० रुपये इतकी रक्कम हस्तगत करण्यात  आली असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

फरासखाना पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवार वाडा गेटसमोर आज दुपारी १२ वाजता एका इसमाकडून  ही रक्कम जप्त करण्यात आली. रकमेबाबत सदर व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका