Shivajirao Adhalarao Patil | आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अजितदादांसह भाजपाच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती

लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढलराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उमेदवारी जाहीर केलेली आहे. आज आढळराव पाटील यांना हे उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार मेधा कुलकर्णी अशा दिग्गजांची उपस्थिती होती.

गुरुवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांचे लांडेवाडी येथील निवासस्थानी कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सर्व ग्रामदेवत श्री भैरवनाथ मंदिर, मारोती आणि विठ्ठल रुख्मिणी मंदिरात जाऊन दर्शन करून त्यांचे बालगंधर्व रंगमंदिर येथे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बालगंधर्व रंगमंदिर ते डेक्कन या मुख्य पदयात्रेला सुरुवात केली. त्यानंतर डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले. महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ