टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद देतेय ‘या’ आजाराशी झुंज, दुबईत सुरू आहेत उपचार

सोशल मीडिया सेंसेशन उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमी तिच्या अतरंगी ड्रेसमुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अशातच पुन्हा एकदा उर्फी जावेद चर्चेत आली आहे. परंतु यावेळी तिचे चर्चेत येण्याचे कारण वेगळे आहे. टीव्ही अभिनेत्री उर्फीला एक आजार आला आहे आणि त्यावर ती दुबईत उपचार घेत आहे.

खरे तर उर्फी सध्या दुबईत आहे. दुबईच्या हॉस्पिटलमधील उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डॉक्टर तिला बोलण्यास नकार देताना दिसत आहेत. त्यामुळे उर्फीला नक्की झाले तरी काय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तर उर्फीला लॅरिन्जायटीस नावाचा आजार झाला आहे.

दुबईत उर्फीची प्रकृती खालावल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अनेक तपासण्या केल्यानंतर तिला लॅरिन्जायटीस झाल्याचे कळले. सध्या दुबईचे डॉक्टर तिच्या या आजारावर उपचार करत आहेत. उर्फीने दुबईच्या हॉस्पिटलमधील तिचा व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या व्हिडिओत ती सांगतेय की, दुबईला पोहोचताच तिला तिच्या ‘लॅरिन्जायटीस’ या आजाराची माहिती मिळाली. त्यामुळे ती दुबईत नीट फिरूही शकली नाही आणि पूर्ण वेळ तिला खोलीत आरामात घालवावा लागला.

लॅरिन्जायटीस म्हणजे काय?
लॅरिन्जायटीस हा गंभीर आजार नाही. लॅरिन्जायटीस हा घशाशी संबंधित आजार असून यामध्ये व्हॉइस बॉक्समध्ये जळजळ आणि संसर्ग होतो. जर ते जास्त वाढले तर तुमचा आवाज हळूहळू खराब होऊ लागतो. जर हा आजार जास्त वाढला तर तुमचा आवाज जवळजवळ ओळखता येत नाही. हा आजार गंभीर नाही, पण त्यावर योग्य वेळी उपचार न केल्यास इतर अनेक प्रकारच्या संसर्गाला जन्म देऊ शकतो.