Jayant Patil | रवींद्र धंगेकर पुण्यात आणि देशात दंगा केल्याशिवाय राहणार नाही

Jayant Patil | पुणे जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. हे तिन्ही अर्ज विजयी अर्ज आहे. पुणे जिल्ह्यातील मतदार सूज्ञ आहेत. ते महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संधी देतील असे जयंत पाटील (Jayant Patil) महाविकास आघाडीच्या पुण्यातील जाहीर सभेत म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की,बेरोजगारी, महागाई, जीएसटीच्या मुद्द्यांवरूनदेखील जयंत पाटील यांनी केंद्र सरकार, महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.  केंद्र सरकारला तुम्हाला १८ टक्के जीएसटी द्यावा लागतो. हे सरकार लूट करत आहे.
देशभरातून इंडिया आघाडीला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. या देशामध्ये लोकांनी आपले मत नक्की केले आहे. इंडिया आघाडीला ते प्रतिसाद देतील. भंडारा जिल्ह्यातील राहुल गांधींची सभा पाहून महायुतीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांना अजूनही उमेदवार ठरवता येत नाही. काही ठिकाणी उमेदवार बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. असे जयंत पाटील म्हणाले.

पुढे जयंत पाटील म्हणाले की,ज्या लोकांना संसदरत्न काय आहे हे माहीत नाही. ते संसदरत्न कसा कमी आहे, हे सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे, आणि म्हणून त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाहीयेत. आहेत ते उमेदवार बदलण्याचं धोरण मनात ठेवून काही ठिकाणी काम चालू आहे. रवींद्र धंगेकर पुण्यात आणि देशात दंगा केल्याशिवाय राहणार नाही. पुणेकरांना महागाई, बेकारी, कायदा व सुव्यवस्था, कोयता गँग यांच्या विरोधात मत द्यायचं असेल, तर ते धंगेकरांनाच मत देतील असेही जयंत पाटील म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले